Ceiling Plaster Collapses In Kopri: कोपरी येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून 27 वर्षीय तरुण जखमी

ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, 50 वर्षे जुन्या असलेल्या चार मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये ही घटना पहाटे 4:05 वाजता घडली.

Ceiling Plaster Collapses प्रतिकात्मक प्रतिमा (PC - X/@robcarney)

Ceiling Plaster Collapses In Kopri: ठाण्यातील कोपरी येथे रविवारी पहाटे खोलीतील सिलिंग प्लास्टर कोसळल्याने 27 वर्षीय तरुण जखमी झाला. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, 50 वर्षे जुन्या असलेल्या चार मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये ही घटना पहाटे 4:05 वाजता घडली. या घटनेत सूरज सोलंकी नावाचा 27 वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या स्तंभांना भेगा पडल्या आहेत. संरचनेचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत आहे. अग्निशमन दल आणि आरडीएमसीच्या जवानांनी मदतकार्य सुरु केले आहे.  खोलीतील दोन रहिवाशांना सुरक्षिततेसाठी हलवण्यात आले आहे, असंही तडवी यांनी सांगितलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now