Block On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी गॅन्ट्री उभारणीसाठी 2 तासांचा ब्लॉक
Block On Mumbai-Pune Expressway: ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्यासाठी मंगळवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पुणे-कडे जाणार्या लेनवर दोन तास वाहतूक ठप्प राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्याने सोमवारी दिली. महामार्ग व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगद्यावरील गॅन्ट्री उभारण्यासाठी एक्स्प्रेस वेची पुणे-कडे जाणारी लेन दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवली जाईल, असे एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)