Heat Stroke Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, उष्माघाताचा दुसरा बळी

छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) उष्माघाताने 24 तासाच दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.सोयगाव तालुक्यातील घोसला येथे १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला.

Representational Image (File Photo)

Heat Stroke Death: छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) उष्माघाताने 24 तासात दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सोयगाव तालुक्यातील घोसला येथे १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला. सुमन सर्जेराव (Heat Stroke Death) पवार असे त्या तरूणीचे नाव होते. आईसोबत शुक्रवारी शेतात गेली तेव्हा उन्हामुळे तिला संध्याकाळी अस्वस्थ वाटतं होते. रात्री झोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमन उठत नसल्याचे पाहून तिला उठवण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला. ती हलत नसल्याचे पाहून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले . परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रात्री झोपेतच तिचा मृत्यू झाला होता. सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ सुरू आहे. शनिवारी सोयगावमधील तापमानाचा पारा ४४ अंशावर होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते सामसूम होतात. सगळे झाडांच्या सावलीत निवारा शोधत आहेत. (हेही वाचा: Marathwada Heat Stroke Death: मराठवाडा मध्ये उष्माघाताचा पहिला बळी)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement