Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ

मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Fire In Bandra (फोटो सौजन्य - X/@republic)

Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी दुपारी भीषण आग लागली. मात्र दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर ती आटोक्यात आली. या आगीत कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु 15-20 झोपड्या जळून खाक झाल्या. मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही आग लेव्हल 1 म्हणून वर्गीकृत करण्यात आली होती आणि अग्निशमन कार्यासाठी चार फायर इंजिन तैनात करण्यात आले होते.

वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, पहा व्हिडिओ -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement