मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'यलो अलर्ट'! विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा IMD चा इशारा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. I

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'यलो अलर्ट'! (Photo Credit - X)

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २८ ऑक्टोबर रोजी मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD ने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी बुधवार, २९ ऑक्टोबर पर्यंत, तर पालघर जिल्ह्यासाठी ३० ऑक्टोबर पर्यंत 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. चक्रीवादळ 'मोंथा' च्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील हालचाली वाढल्या असून, किनारपट्टीच्या भागात हवामानातील बदल दिसून येत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement