'Sky Debris' Falls in Nagpur? नागपूरच्या उमरेड तालुक्यात घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग असल्याची चर्चा, तपास सुरु

स्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला.

'Sky Debris' Falls in Nagpur?

या अनेकदा ‘अवकाशातील कचरा’ पृथ्वीवर पडल्याचा घटना घडल्या आहेत. अवकाशातील कचरा म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या मानवनिर्मित वस्तू, ज्या आता कार्य करत नाहीत, जसे की निष्क्रिय उपग्रह, रॉकेटचे तुकडे इत्यादी. आता महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एका घराच्या टेरेसवर आकाशातून एक अज्ञात वस्तू पडली आहे. त्यानंतर ती 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, शनिवारी पहाटे 4 वाजता कोसे लेआउटमधील एका घराच्या टेरेस स्लॅबवर आकाशातून एक मोठा धातूचा तुकडा पडला.

पोलिसांचे फॉरेन्सिक पथक ही वस्तू ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला. स्काय वॉच ग्रुपचे प्रमुख आणि खगोलशास्त्रातील उत्साही सुरेश चोपणे यांनी दावा केला की, ही धातूची वस्तू अवकाशात पाठवलेल्या उपग्रहाच्या रॉकेट बूस्टरचा भाग असू शकते. (हेही वाचा: ISRO is Sending 'Water Bears’ to Space: इस्रो Axiom-4 सोबत अंतराळात पाठवणार 'वॉटर बेअर्स', जाणून घ्या काय आहेत हे प्राणी व होणारा प्रयोग)

घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement