'Aapli PMPML' Mobile App: पुणेकरांना दिलासा! लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप; जाणून घ्या कशी होईल मदत
‘आपली पीएमपीएमएल’ ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बस मार्गांची माहिती देईल. यात लाईव्ह लोकेशन फीचर देखील असेल.
Aapli PMPML: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आपली पीएमपीएमएल’ हे बहुप्रतिक्षित मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले. हे ॲप 17 ऑगस्टपासून अँड्रॉइड डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. या ॲपचे उद्घाटन पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना, पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे म्हणाले, टहे ॲप प्रवाशांना खूप उपयुक्त ठरेल. हे वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि सेवा प्रदान करेल. यासोबतच या ॲपमुळे वापरकर्त्यांना पुणे मेट्रोची तिकिटे खरेदी करणेही शक्य होणार आहे, ज्यामुळे हे ॲप शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एक व्यापक साधन बनेल.’
‘आपली पीएमपीएमएल’ ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बस मार्गांची माहिती देईल. यात लाईव्ह लोकेशन फीचर देखील असेल. ॲपच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग, युपीआय पेमेंट आणि तक्रारी दाखल करणे समाविष्ट आहे. पीएमपीएमएलचे हे मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याचे काम वर्षभरापासून सुरू होते. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात 10 दिवस दारूबंदीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)