Monkeypox Virus: भारतात आढळला मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी
आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या (Monkeypox Virus) संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादी देखील दिली आहे. जारी केलेल्या निर्देशामध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश केला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे. 2005च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे. राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर ही आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. मंकीपॉक्स क्लेड 1 चे लक्षणे क्लेड 2 सारखीच असली तरी, क्लेड 1 मध्ये जटिलतांचा धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे. (हेही वाचा: Chemotherapy Day Care: कर्करोग रूग्णांना खर्चिक उपचारापासून दिलासा; सरकारकडून 34 जिल्ह्यांमध्ये 'केमोथेरपी डे केअर' केंद्राची सुविधा उपलब्ध)
केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मंकीपॉक्सबाबत सूचना जारी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)