Monkeypox Virus: लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करून घेण्याचे मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

आरोग्य विभाग या आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जाते

Monkeypox Virus: लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करून घेण्याचे मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असे सांगितले आहे. मात्र याबाबतची लक्षणे आढळून आल्यानंतर लोकांना चाचण्या करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले की आरोग्य विभाग या आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जाते. दक्षिण आफ्रिका, यूके आणि यूएसएसह जगाच्या विविध भागांमध्ये मंकीपॉक्स रोगाच्या प्रसाराची राज्य सरकारने दखल घेतली आहे. हा विषाणू हवेतून पसरत नाही तर तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा प्राण्यांकडून प्राण्यांमध्ये पसरतो. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, विषाणूची लक्षणे सुमारे 2 ते 4 आठवडे टिकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement