Zomato Down: झोमॅटो डाऊन झाल्याचा दावा, ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डर देताना अडथळा, अनेक युजर्सकडून सोशल मीडियाद्वारे तक्रार
बुधवारी (6 एप्रिल) असंख्य ग्राहक झोमॅटो अॅपचा वापर करुन ऑनलाईन ऑर्डर देत होते. मात्र, ऑर्डर देताना त्यांना अडथळा येऊ लागला.
भारतातील सर्वात मोठा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेल्या झोमॅटो कंपनीची सेवा बंद असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. बुधवारी (6 एप्रिल) असंख्य ग्राहक झोमॅटो अॅपचा वापर करुन ऑनलाईन ऑर्डर देत होते. मात्र, ऑर्डर देताना त्यांना अडथळा येऊ लागला. अनेकदा सेवा अनुपलब्ध असा संदेश यायचा किंवा बराच काळ Zomato स्क्रोल होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ग्राहकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरद्वारे आपल्या तक्रारी झोमॅटोकडे पोहोचवल्या आहेत. या प्रकारामुळे 'झोमॅटो गोज डाउन' हा ट्रेंड सुरू ट्विटरवर सुरु झाला.
ट्विट
ट्विट
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)