World's Best Street Sweets: भारतातील म्हैसूर पाक, कुल्फी आणि कुल्फी फालुदाचा जगातील टॉप-50 स्ट्रीट फूड स्वीट्समध्ये समावेश, जाणून घ्या यादी

‘टेस्ट ऍटलस’ने (Taste Atlas) जगभरातील सर्वात स्वादिष्ट मिठाईंची यादी जारी केली. यामध्ये भारतातील 3 स्ट्रीट फूड मिठाईंना मिळाले आहे. टेस्ट ऍटलस हे फूड मॅगझिन आहे,

World's Best Street Sweets

भारतीय मिठाई या आजपासून नव्हे तर शतकानुशतके जगाला भुरळ घालत आहेत. गुलाब जामुन, रसगुल्ल्यापासून ते घेवर, काजू कतली आणि इतर अनेक स्वादिष्ट पदार्थांची नावे जरी ऐकली तरी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. आता ‘टेस्ट ऍटलस’ने (Taste Atlas) जगभरातील सर्वात स्वादिष्ट मिठाईंची यादी जारी केली. यामध्ये भारतातील 3 स्ट्रीट फूड मिठाईंना मिळाले आहे. टेस्ट ऍटलस हे फूड मॅगझिन आहे, जे जगभरातील स्ट्रीट फूडचा तपशीलवार आढावा घेते आणि दरवर्षी रँकिंग जारी करते.

टेस्ट अॅटलसने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या यादीनुसार, म्हैसूर पाक 14व्या स्थानावर आहे. त्यानंतर कुल्फी आणि कुल्फी फालुदा अनुक्रमे 18 आणि 32 व्या क्रमांकावर आहेत. टॉप 10 मिठाईच्या यादीत पोर्तुगालची पेस्टल दे नाटा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशियाचा सेराबी, तुर्कीचा डोंडुर्मा, दक्षिण कोरियाचा हॉटिओक आणि थायलंडचा पा थोंग को यांचा क्रमांक लागतो. (हेही वाचा: Best Chicken Dish In World: जगातील 50 सर्वोत्तम चिकन डिशच्या यादीत भारताने पटकावला क्रमांक, टेस्ट अॅटलास कडून यादी जाहिर)

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now