Best Chicken Dish In World: जगातील 50 सर्वोत्तम चिकन डिशच्या यादीत भारताने पटकावला क्रमांक, टेस्ट अॅटलास कडून यादी जाहिर
दरम्यान, भारतातील चिकन टिक्का आणि चिकन तंदूरीला जगभरातील 3 ऱ्या आणि 19व्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चिकन डिश म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Best Chicken Dish In World: टेस्ट अॅटलास (Tasteatlas) यांनी नुकतेच जगातील 50 सर्वोत्तम चिकन डिशची यादी जाहीर झाली आहे. टेस्ट अॅटलास हे पारंपारिक खाद्यपदार्थ आणि पदार्थ संशोधनाचे लेख प्रसारित करते. खाद्य समीक्षक पुनरावलोकचे काम सुद्दा करते. टेस्ट अॅटलास हे जागतिक स्तरावर काम करताना दिसते. मुर्ग मखनी, बटर चिकन, टीक्का, आणि तंदूरी मुर्ग जे भारतीय डिश 50 सर्वोत्तम चिकन डिशच्या यादीत सामावलेले आहे. जोजेह कबाब आणि जूजेह कबाब -इरान देशातील पारंपारिक डिशने सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे. दाक गल्बी आणि स्पाइसी फ्राइड चिकन हा दक्षिण कोरीयातील पारंपारिक खाद्यपदार्थाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचदरम्यान चिकन टिक्का आणि तंदूरी मुर्ग ह्या खाद्यपदार्थांनी भारताचे प्रतिनीधीत्व करत 4 आणि 19 वा क्रमांक पटकावला.