Best Stews In The World: भारतातील कीमा, दाल तडका, शाही पनीर, मिसळसह 9 पदार्थ जगातील टॉप डिशेसमध्ये समाविष्ट; पहा जगातील सर्वोत्कृष्ट 'स्टू'जची यादी (View Post)
यामध्ये भारतामधील 9 पाककृतींना स्थान मिळाले आहे.
Best Stews In The World: भारत आपल्या विविध खाद्यपदार्थांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतामधील अनेक पदार्थ परदेशात आवडीने खाल्ले जातात. आता भारतीय पदार्थ जगामध्ये लोकप्रिय होत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. लोकप्रिय खाद्य मार्गदर्शक टेस्ट ॲटलसने (Taste Atlas) ने नुकतेच जगातील स्टू श्रेणीमधील रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतामधील 9 पाककृतींना स्थान मिळाले आहे. यामध्ये कीमा 6व्या स्थानावर, चिंगरी मलाई करी 18व्या, कोरमा 22व्या, विंदालू 26व्या, दाल तडका 30व्या, साग पनीर 32व्या, शाही पनीर 34व्या, मिसळ 38व्या आणि दाल 50व्या स्थानावर आहे. या सार्क पदार्थांनी प्रतिष्ठित टॉप-50 यादीत स्थान मिळवले. या सर्व पदार्थांचा जगातील सर्वोत्तम 50 स्टूजच्या यादीत समावेश झाला आहे. स्टू म्हणजे रस्सा भाजी किंवा यामध्ये मांस/भाज्या पाण्यात घालून शिजवून केलेला अन्नपदार्थ. टेस्ट ॲटलस नियमितपणे जगातील सर्वोत्तम खाद्यपदार्थ आणि प्रवासाचे अनुभव हायलाइट करणाऱ्या याद्या तयार करते. (हेही वाचा: Gutkha Ice Cream: गुटखाप्रेमींसाठी आली नवीन आईस्क्रीम! सोशल मीडियावर व्हायरल होतोय विमल टाकून केलेल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)