Ashadhi Ekadashi 2023: उद्धव ठाकरे यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शुभेच्छा देताना पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापूजेच्या वेळचा आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शुभेच्छा देताना पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूर येथे केलेल्या विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापूजेच्या वेळचा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वत: कार चालवत पंढरपूरला पोहोचले होते. तेथे त्यांनी पांडुरंगाची महापूजा केली. तसेच राज्यातील आणि देशातील जनतेलाही कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी बळ दे, बळीराजाला सुखी ठेव, अशी प्रार्थना करुन साकडे घातले होते. (हेही वाचा, Ashadhi Ekadashi 2023 Messages: आषाढी एकादशी निमित्त सोशल मीडियावरुन द्या विठ्ठलभक्तांना शुभेच्छा! WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्रामवर साजरी करा देवशयनी एकादशी)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now