Shirdi Guru Purnima Utsav 2022: शिर्डीमध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा होणार गुरु पौर्णिमेचा उत्सव; जाणून घ्या काय असेल कार्यक्रम
शिर्डीच्या साई बाबा संस्थानमध्येही हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरूची पूजा केली जाते. हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांसारखे अद्भुत साहित्य रचणारे पौराणिक काळातील महान व्यक्तिमत्त्व महर्षि वेद व्यास जी यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, अशी मान्यता आहे. यंदा 13 जुलै, बुधवारी गुरू पौर्णिमा आहे. शिर्डीच्या साई बाबा संस्थानमध्येही हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. यंदा शिर्डीमध्ये 12 जुलै 2022 ते 14 जुलै 2022 या दरम्यान हा उत्सव साजरा होणार आहे. संस्थानतर्फे या उतसावाची निमंत्रण पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
जाणून घ्या काय असेल कार्यक्रम-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)