Shab-e-Barat Mubarak 2023: शब-ए-बारात च्या शुभेच्छा Wishes, Messages च्या माध्यमातून शेअर करत साजरी करा Mid-Sha’ban!
शाबान महिन्याच्या 14 आणि 15 तारखेच्या मध्यरात्री शब-ए-बरात साजरी केली जाते.
भारतामध्ये आज धुलिवंदनासोबतच मुस्लिम बांधव आजची रात्र शब-ए-बारात ची रात्र म्हणून पाळणार आहे. शब-ए-बारातच्या (Shab-e-Barat) रात्री जागून अल्लाह कडे खास प्रार्थना करण्याची रीत आहे. पूर्वजांच्या स्मृतिला देखील भेट देण्यासाठी अनेकजण कब्रस्तानावर जातात. यावेळी प्रार्थनेदरम्यान मृत्यूनंतर ‘जन्नत’ प्राप्त व्हावा यासाठी कामना करण्याची रीत आहे. तर चूकांची कबुली देऊन त्यामधून मुक्तता मिळावी यासाठी खास प्रार्थना केली जाते. इस्लाम धर्मात रमजानचा पवित्र महिना सुरू होण्याच्या 15 दिवस आधी शब-ए-बरात साजरी केली जाते. शाबान महिन्याच्या 14 आणि 15 तारखेच्या मध्यरात्री शब-ए-बरात साजरी केली जाते. मग आजची ही रात्र तुमच्या मित्रमंडळी, प्रियजनांसाठी खास व्हावी म्हणून शुभेच्छापत्र नक्की शेअर करा.
शब-ए-बारातच्या शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)