Republic Day 2023 Parade Live Streaming: दिल्लीच्या कर्तव्य पथावर साजरा होणार यंदाचा 74 वा प्रजासत्ताक दिन; पहा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

26 जानेवारी रोजी सकाळी 7,30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि 10 वाजल्यापासून परेड सुरु होईल.

Republic Day parade | Representational image | (Photo Credits: PTI)

भारत गुरुवारी आपला 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. देशभरात या राष्ट्रीय उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच अनावरण केलेल्या कर्तव्य पथ येथे राष्ट्रध्वज फडकावतील. परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर 21 तोफांची सलामी देऊन राष्ट्रगीत होईल. राष्ट्रपतींनी मानवंदना स्वीकारल्यानंतर परेडला सुरुवात होईल. इजिप्तचे राष्ट्रपती, महामहिम अब्देल फताह अल-सिसी हे यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड हा भारतीयांसाठी एक खास कार्यक्रम असतो.

या परेड दरम्यान ब्रह्मोस, नाग क्षेपणास्त्रासोबत इतर अनेक स्वदेशी शस्त्रास्त्रांसह भारतीय लष्कर आपले सामर्थ्य दाखवणार आहे. यासह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, लडाख, जम्मू-काश्मीर, गुजरात, पश्चिम बंगाल, आसामसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सुंदर आणि मनमोहक चित्ररथ पाहायला मिळतील. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 26 जानेवारी रोजी भारताचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा, आर्थिक आणि सामाजिक प्रगती दर्शविणारे 23 चित्ररथ सहभागी होतील.

26 जानेवारी रोजी सकाळी 7,30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि 10 वाजल्यापासून परेड सुरु होईल. या कार्यक्रमाचे देशातील सर्व वृत्तवाहिन्या आणि रेडिओ केंद्रांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तुम्ही देखील आपापल्या घरी बसून या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल.

Republic Day 2023 Parade Live Streaming -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now