Pune Traffic Diversion Advisory: पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता सह हे महत्त्वाचे रस्ते संध्याकाळी 5 नंतर राहणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी
पुण्यातील महत्त्वाचे रस्ते लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता 18 सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 5 नंतर बंद राहणार आहे.
घरगुती गणपतींचं विसर्जन झालं की पुण्यामध्ये सार्वजनिक मंडळांमधील गणपती पहायला गर्दी वढते. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही महत्त्वाचे रस्ते आज 11 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री गर्दी कमी होईपर्यंत बंद ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील महत्त्वाचे रस्ते लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्राफिक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये वाहतूकीत बदल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)