Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: आता घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Watch)
या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कित्येक किलोमीटरची रांग लागलेली असते. अशात काही वेळा रांगेत उभे राहून गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी 20 ते 25 तास लागतात.
Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: देशभरात आज गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर या सणाची खास धामधूम पाहायला मिळते. राज्यात काही मंडळांचे गणपती हे विशेष प्रसिद्ध आहेत व त्यामध्ये अग्रणी आहे तो म्हणजे मुंबईमधील लालबागचा राजा. नवसाला पावणारा अशी या गणपती ख्याती आहे त्यामुळे लांबून लोक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कित्येक किलोमीटरची रांग लागलेली असते. अशात काही वेळा रांगेत उभे राहून गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी 20 ते 25 तास लागतात. मात्र तुम्ही घरबसल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकतात. यासाठी मंडळाने त्यांच्या सोशल मिडिया खात्यांवर सोय उपलब्ध करून दिली आहे. लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर तुम्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता. (हेही वाचा: Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)