Dhanteras 2022: धनत्रयोदशीची तारीख आणि सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या
. धनत्रयोदशीला वस्तू खरेदी केल्यास ती सात पटीने वाढते अशी आस्था आहे, त्यामुळे सोने चांदी खरेदी करायची पद्धत आहे. मौल्यवान वस्तू शुभ वेळेत खरेदी करणे आणखी लाभकारी ठरेल, आम्ही तुमच्यासाठी शुभ मुहूर्तचा एक सविस्तर व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ
Dhanteras 2022: धनतेरस किंवा धनत्रयोदशी पासून दिवाळीची धामधूम सुरू होते. यंदा धनतेरस 23 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्तूंची देखील खरेदी करतात. धनत्रयोदशी यंदा 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 ते 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत असेल. दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करणे शुभ ठरेल. धनतेरसला धन्वंतरीचे पूजन देखील करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीला वस्तू खरेदी केल्यास ती सात पटीने वाढते अशी आस्था आहे, त्यामुळे सोने चांदी खरेदी करायची पद्धत आहे. मौल्यवान वस्तू शुभ वेळेत खरेदी करणे आणखी लाभकारी ठरेल, आम्ही तुमच्यासाठी शुभ मुहूर्तचा एक सविस्तर व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [ हे देखील वाचा: Dhanteras 2022 Things to Buy & Avoid For Good Luck: धनत्रयोदशीला करा या वस्तूंची खरेदी, सुख संपत्ती नांदेल घरात, पाहा यादी ]
पाहा व्हिडीओ: