IPL Auction 2025 Live

Kisan Diwas 2022: शेतकरी दिन 23 डिसेंबरला का साजरा केला जातो? जाणून घ्या- या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्व

Kisan Diwas 2022

Kisan Diwas 2022: भारत हा शेती प्रधान देश आहे. भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो.चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. चौधरी चरण सिंह 1979-1980 दरम्यान भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी देशातील अनेक शेतकरीसंबंधी सुधार धोरणांमध्ये योगदान दिले.

राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास

देशाचे पंतप्रधान म्हणून अल्प कालावधीत चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनाही सुरू केल्या. सावकार आणि त्यांच्या अत्याचारांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये कर्जमुक्ती विधेयक आणले. 1962-63 पर्यंत त्यांनी सुचेता कृपलानी यांच्या मंत्रालयात कृषी आणि वनमंत्री म्हणूनही काम पहिले. 2001 मध्ये तत्कालीन सरकारने चरणसिंग यांची जयंती किसान दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या