International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत
जगभरात 24 जून 2024 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
International Yoga Day 2024: जगभरात 24 जून 2024 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी योग कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी उष्ट्रासन(Ushtrasana ) या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'उष्ट्रासनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात. शरिरात रक्ताभिसरण सुधारते. त्या सोबतच दृष्टीही सुधारते', असे पंतप्राधान मोदी यांनी व्हिडीओ शेअर करताना त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहीले आहे. (हेही वाचा:PM Modi On Yoga Day 2024: पीएम मोदींनी 'ट्विटर एक्स' वर योग दिनासंदर्भात शेअर केला अनोखा संदेश, पाहा पोस्ट )
या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यास शरीरात वेगळे चैतन्य निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते. त्यामुळे निरोगी जीनव आपण जगू शकतो. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ठ, अपचन दूर होण्यास मदत होते.
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)