Shiv Pratap Din 2023 Wishes: शिव प्रताप दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Greetings शेअर करत साजरा करा खास दिवस!
या दिवसानिमित्त लोक शिवराजांच्या कार्याचा गौरव करत एकमेकांना शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील ईमेज, ग्रेटिंग, मेसेज शेअर करत सोशल मीडियाद्वारे शि
Shiv Pratap Din 2023 Wishes: 10 नोव्हेंबर हा दिवस मराठा साम्राज्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. सुमारे 354 वर्षांपूर्वी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूला झुगारून आपल्या बलाढ्य शत्रू अफझलखानाचा चतुराईने वध केला. अफजलखान हा विजापूरच्या आदिलशाही राजवटीचा अत्यंत हुशार, निष्ठावान आणि शूर सेनानी होता, तो शत्रूवर विजय मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जात असे. त्याचे हे गुण पाहून आदिलशहाच्या आईने अफझलखानाला प्रचंड सैन्यासह मराठा साम्राज्य काबीज करण्यासाठी पाठवले. अफझल शिवाजीच्या शौर्याशी परिचित होता, त्याला माहित होते की कोणताही मुघल शासक शिवाजी महारांजाना समोरून पराभूत करू शकत नाही. त्याने शिवाजीच्या हत्येचा कट रचला. किंबहुना आदिलशहाने शिवाजीचा पराभव करण्यासाठी अफझलखानासोबत प्रचंड सैन्य पाठवले होते. मात्र, शिवरायांनी अफजलखानाचा संपूर्ण कट उधळून लावला आणि त्याचा वध केला. त्यामुळे या दिवसाला मराठ्यांच्या इतिहासात अतिशय महत्त्व आहे. या दिवसानिमित्त लोक शिवराजांच्या कार्याचा गौरव करत एकमेकांना शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील ईमेज, ग्रेटिंग, मेसेज शेअर करत सोशल मीडियाद्वारे शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)