Banjara Teej 2024: मोठ्या उत्साहात पार पडला बंजारा तीज महोत्सव (Watch Video)
या सणाला बंजारा समाजात एक विशेष महत्त्व आहे. देशभरात ठिकठिकाणी बंजारा तांड्यावर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळते. मुळात तीज सण हा दहा दिवस साजरी केली जाते.
Banjara Teej 2024: श्रावण महिन्यात दर वर्षी संस्कृतीने समृध्द असलेला बंजारा समाजातील लोक गावोगावी तीज महोत्सव साजरी करतात. या सणाला बंजारा समाजात एक विशेष महत्त्व आहे. देशभरात ठिकठिकाणी बंजारा तांड्यावर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळते. मुळात तीज सण हा दहा दिवस साजरी केली जाते. राखी पौर्णिमेपासून पुढील १० दिवस प्रत्येकाच्या घरात हा सण साजरा केला जातो. अविवाहित मुली छोट्या टोपात गहूची पेरणी करतात. त्याला रोज पाणी घालतात. बोली भाषेत कृष्णाची गीते म्हणतात आणि त्याची पूजा करतात. त्यानंतर त्याला नैवेद्य दिले जाते. दहा दिवसांनतंर या गहूचे नदीत विसर्जन केले जाते. विसर्जन करताना गावातील प्रत्येक मंडळी यात सहभागी होतात. महिला आणि मुली मोठ्या उत्साहात नाचतात तसेच लोकगीत बोलतात. (हेही वाचा- यंदा काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी साजरा केला जाणार गणेशोत्सव; पुण्यातील मानाच्या गणपतींच्या प्रतिकृती होणार स्थापन)
पाहा महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो तीज महोत्सव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)