Anil Kumble At Maha Kumbh: अनिल कुंबळे पत्नीसह महाकुंभमध्ये सहभागी; त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (See Pics)
अनिल कुंबळे, पत्नी चेतना रामतीर्थासोबत महाकुंभ 2025 मध्ये सहभागी झाले आहेत. प्रयागराजमध्ये कुंबळे यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
Anil Kumble At Maha Kumbh: भारतीय क्रिकेट विश्वासतील दिग्गज खेळाडू देखील महाकुंभमध्ये सहभागी होत आहेत. माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी पत्नी चेतना रामतीर्थासह महाकुंभमेळा 2025 मध्ये (Maha Kumbh) सहभाग घेतला. कुंबळे दामपत्याने आज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर, प्रज्ञाराज येथील त्रिवेणी संगमावरील तसेच पवित्र गंगा नदीत स्नान करतानाचे फोटो शेअर केले. आशुतोष शर्मा, मयंक अग्रवाल आणि सुरेश रैना यांच्यासह अनेक इतर क्रिकेटपटूंनी आत्तापर्यंत महाकुंभ 2025 ला भेट दिली आहे आणि गंगा नदीत स्नान केले आहे. (Maha Kumbh 2025: मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह महाकुंभ संगममध्ये केले स्नान)
अनिल कुंबळे यांनी महाकुंभाला दिली भेट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)