Miss Universe 2023 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार्या Divita Rai चा 'गोल्डन अंदाज'; भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी केली ही वेशभूषा (Watch Video)
आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या भारत देशाला एकेकाळी 'सोनेकी चिडिया' म्हणून संबोधलं जात होतं.
Miss Universe 2023 ची अमेरिकेमध्ये सुरूवात झाली आहे. भारताचं प्रतिनिधित्व करणार्या Divita Rai ची सध्या चर्चा आहे. दिविता च्या दिमाखदार ड्रेसने सार्यांनी लक्ष वेधलं आहे. भारताच्या सुबकतेचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी तिने सोनेरी पक्षी च्या अंदाजात आपला ड्रेस परिधान केला होता. मध्य प्रदेशच्या चंदेरी भागात कुशल कारागिरांनी स्वतः हाताने विणलेला लेहंगा तिने परिधान केला होता. सोबतच मेटॅलिक विंग देखील घातले होते.
पाहा सोनेरी ड्रेस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)