Yash Dayal controversial Post: यश दयाल यांनी लव्ह जिहादबद्दल केली पोस्ट, नंतर माफी मागत पोस्ट हटवली
या गोंधळानंतर काही वेळातच यश दयाल यांनी त्याची जुनी पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट शेअर करून लोकांची माफी मागितली.
गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल त्याच्या एका पोस्टमुळे सध्या चर्चेत आला आहे. टिकेनंतर त्यांनी हात जोडून माफीही मागितली. गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालने एक पोस्ट शेअर केली होती. जी दिल्लीतील साक्षी हत्या प्रकरणाशी संबंधित होती. काही दिवसांपूर्वी साहिल नावाच्या व्यक्तीने 16 वर्षीय साक्षीची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाशी संबंधित पोस्ट शेअर करून यश चांगलाच अडकला. त्याला चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले आहे. या गोंधळानंतर काही वेळातच यश दयाल यांनी त्याची जुनी पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट शेअर करून लोकांची माफी मागितली.
पाहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)