Tiger Spotted Standing on Wall in UP Video: पिलीभीती येथे जंगली वाघाचा निवासी वस्तीत फेरफटका, नागरिकामध्ये घबराट
त्यानंतर तो एका छतावरून गेला आणि एका शेतकऱ्याच्या घरात घुसला, त्यामुळे कुटुंबीय घाबरून घर सोडून पळून गेले आहे.
उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे एक वाघ जंगलातून बाहेर आला आणि वस्तीत घुसला. त्यानंतर तो एका छतावरून गेला आणि एका शेतकऱ्याच्या घरात घुसला, त्यामुळे कुटुंबीय घाबरून घर सोडून पळून गेले आहे. थंडीमुळे घरातील सदस्य ऊब मिळण्यासाठी शेकोटीजवळ बसले होते, मात्र वाघाला पाहताच त्यांनी घराच्या आत धाव घेतली. मात्र, वाघाने कोणालाही इजा केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक वाघ घराच्या भिंतीवर तळ ठोकून बसलेला दिसत आहे आणि त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. वाघाची सुटका करून जंगलात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)