West Bengal News: बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांना अटक, रेशन घोटाळ्यात छापा टाकून ईडीची मोठी कारवाई

पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावर गुरुवारी (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला.

jyotipriya mallik

पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावर गुरुवारी (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. शिधावाटपातील घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. केंद्रीय दलाच्या पथकाच्या मदतीने कोलकत्ता येथील सॉल्ट लेक परिसरात असलेल्या राज्याचे वनमंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या दोन घरांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now