Viral Video: कुत्र्याच्या पिल्लाला पाजली दारू, व्हिडिओ व्हायरल होताच सवाई माधोपूर पोलीस ठाण्यात कारवाई
ज्यात एक तरुण कुत्र्याच्या पिल्ल्याला दारू पाजत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण कुत्र्याच्या पिल्ल्याला दारू पाजत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वीकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना राजस्थानच्या सवई माधोपूरमधील आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे कुत्र्याच्या पिल्लासमोर तो दारूचा ग्लास ठेवतो आणि त्याला पिण्यास सांगतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने प्राण्यांच्या सुरक्षते विषयी आवाज उठवला आहे. अनेकांनी पोलिसांत कारवाई झालीच पाहिजे अशी विनंती केली आहे. या व्हिडिओमुळे अनेक प्राणी प्रेमीचे मन दुखावले आहे. त्यानंतर सवाई माधोपूर पोलिस ठाण्यात या घटनेअंतर्गत कारवाई सुरु केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे तरुणासोबत त्याचे मित्र देखील सोबत आहे. कुत्र्याला दारू पाजणे हा धोकादायक असू शकतो असं माहित असताना देखील तरुणांनी स्वत:च्या आनंदासाठी प्राणांचा छळ केला जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)