Video: 'आमच्या देशाच्या पोलिसांनी नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर स्वतःला सिद्ध केले आहे, अमित शाह यांच वक्तव्य
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी शहिद पोलिसांना दिल्ली येथील पोलिस स्मारक येथे श्रध्दांजली वाहली.
राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे, पोलिस हुतात्मा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "कोणत्याही राष्ट्रात, सतर्क पोलीस दलाशिवाय सीमा सुरक्षा किंवा अंतर्गत सुरक्षा शक्य नाही... मी असे निरीक्षण केले आहे की सेवा करणाऱ्या सर्व लोकांमध्ये पोलीस कर्तव्य सर्वात कठीण आहे. देशात कोणत्याही वातावरणात किंवा सण-उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नेहमीच कर्तव्यावर असतात... दहशतवाद असो, गुन्हेगारी असो किंवा प्रचंड गर्दी असो, सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी पोलीस नेहमीच तत्पर असतात. आपल्या देशाच्या पोलिसांनी नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर स्वतःला सिद्ध केले आहे..."
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)