Dress Code For Girls-Women In Temples: उत्तराखंडमध्ये 3 मंदिरांमध्ये महिला आणि मुलींसाठी ड्रेस कोड लागू; तोडके कपडे घालणाऱ्या महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही

मंदिरांमध्ये हरिद्वारमधील कंखल येथील दक्ष प्रजापती मंदिर, पौरीमधील नीलकंठ महादेव मंदिर आणि डेहराडूनमधील टपकेश्वर महादेव मंदिर यांचा समावेश आहे.

महानिर्वाणी आखाडा सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी (PC - ANI/Twitter)

Dress Code For Girls-Women In Temples: उत्तराखंडमधील तीन मंदिरांमध्ये महिला आणि मुलींसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. महिला व मुलींना लहान कपडे घालून महानिर्वाणी आखाडा अंतर्गत येणाऱ्या तीन मंदिरात प्रवेश करता येत नाही. मंदिरांमध्ये हरिद्वारमधील कंखल येथील दक्ष प्रजापती मंदिर, पौरीमधील नीलकंठ महादेव मंदिर आणि डेहराडूनमधील टपकेश्वर महादेव मंदिर यांचा समावेश आहे. यासंदर्भात महानिर्वाणी आखाडा सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Dress Code For Devotees in Tuljabhavani Temple: बर्मुडा, वनपीस, पॅन्ट शर्टधारींना नो एन्ट्री; तुळजा भवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now