Delhi: UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू; दिल्लीत पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी

एका २६ वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली.

Representational Image

Delhi: दिल्लीतील पटेल नगर मेट्रोजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना 23 जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली. निलेश राय असं तरुणाचे नाव आहे. लोखंडी गेटला चूकून स्पर्श झाला या लोंखडी गेटला विद्युत केबल लटकलेली होती. यातच त्याला विजेचा जोरात धक्का बसला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)

पाहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)