Kanpur Shocker: दोन बैलाच्या झुंजीत 17 वर्षीत मुलाचा मृत्यू, कानपूर मधील दुर्दैवी घटनाK
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन भटक्या बैलांच्या झुंजीत एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
Kanpur Shocker: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन भटक्या बैलांच्या झुंजीत एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रखर शुक्ला असं नाव असलेल्या मुलाने या घटनेत जीव गमावला आहे. ही घटना कानपूरमध्ये पाणकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सांयकाळी घडली. प्रखर 12वीत शिकत होता. तो बजरंग दलाचा स्थानिक समन्वयक होता. पार्कजवल सांयकाळी स्कूटरवकून जात असताना दोन बैल एकमेकांवर हल्ला करत होते. दरम्यान एका बैलाने रस्त्यावर उडी घातली आणि थेट प्रखरच्या स्कूटरला धडकली यात तो खाली पडून गंभीर जखमी झाला. दुर्घटने नंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)