Kanpur Crime News: पार्टी करत असताना अचानक तरुणाला गोळी लागली, जखमी अवस्थेत जमीनीवर पडला; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
कानपूरमध्ये तरुणाला अचानक गोळी लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या गोळीबारच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kanpur Crime News: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अचानक झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूर जिल्ह्यातील भैरोनघाट पंपिंग स्टेशनजवळ काही तरुण मंडळींचा ग्रुप पार्टी करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रुपमधील दुसऱ्या व्यक्तीने चुकून त्याच्यावर गोळीबार केल्याने एक व्यक्ती अचानक जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अचानक झालेल्या गोळीबार तरुण गंभीर जखमी होवून जमीनीवर पडला. पोलीस ठाण्यात या घटनेअंतर्गत कोणतीही तक्रार नोंदवली नाही अशी माहिती वृत्तांकडून मिळाली आहे. आरोपी आणि पीडितेची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडिओमध्ये अपघाती बंदुकीची गोळी दिसत आहे, परंतु पीडित जखमी होण्याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement