UP Nikah Video: कानपूरमध्ये हिंदू तरुणीचे धर्मांतर, मुस्लिम तरुणाशी लग्न; 'निकाह'चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश
त्यात एक मुस्लिम तरुण एका हिंदू तरुणीशी विवाह (निकाह) करत असताना दिसत आहे. या व्हिडिओ नंतर पोलीसांकडून चौकशी आदेश देण्यात आले आहे.
UP Nikah Video: कानपुरमधून एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी चौकशी सुरु केले आहे. सदर व्हिडिओ मध्ये एक मुस्लिम तरुण एका हिंदू तरुणीशी विवाह (निकाह) करत असताना दिसत आहे. स्थानिक हिंदू तरुणाने मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील चौबेपूर भागातील दाम्पत्य त्यानंतर अज्ञातस्थळी गेले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जोडप्याने आधी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते, मात्र नंतर हिंदू तरुणाचे धर्मांतर करून मुस्लिम तरुणीशी लग्न केले. सुरुवातीला पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी तरुणांवर त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोपही केला होता आणि तक्रार दाखल केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)