UP Crime: भररस्त्यात महिलेचा फोन हिसकावून चोर पळाला; घटना सीसीटीव्हीत कैद
ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
UP Crime: उत्तर प्रदेशात नोएडामध्ये दिवसाढवळा महिलेच्या मोबाईल एका चोरट्यांने हिसकावला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरट्याने मोबाईल हिसकावून पळ काढला आहे. भररस्त्यात चोरट्याने महिलाचा महागडा मोबाईल चोरला आहे. उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस गुन्हेगारींत वाढ होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. नोएडाच्या उच्चस्तरीय सेक्टर ३४ मध्ये ही घटना घडली आहे. महिला फोन वर बोलत असताना मागून येवून चोरट्यांने मोबाईल हिसकावला. चोराने घटनास्थळावरून पळ काढला. महिला देखील चोराच्या मागे पळत होती. महिलेने पोलीसांत तक्रार केली आहे. चोरट्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)