PM Modi Security Breach: मोदींच्या पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी

मोदींच्या पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेबाबत घडलेल्या चुकीची उच्चस्तरीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत तातडीने चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, मोदींच्या पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement