Howrah-Mumbai Train Decouples: मोठा अपघात टळला! बिरशीबपूरमधील उलुबेरिया स्टेशनजवळ मुंबईकडे जाणाऱ्या हावर्ड मेलचे दोन डबे झाले वेगळे, Watch Video

12810 हावडा-मुंबई मेलचे (Howrah-Mumbai Train) दोन डबे बिरशिबपूर परिसरात रात्री 9.30 च्या सुमारास वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

2 Coaches Of Howrah-Mumbai Train Decouples (PC - ANI)

Howrah-Mumbai Train Decouples: शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम बंगालमधील उलुबेरिया स्थानकाजवळ (Uluberia station) मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनचे दोन डबे वेगळे झाले. ट्रेन जास्त वेगाने जात नसल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, सुदैवाने मोठा अपघात टळला. 12810 हावडा-मुंबई मेलचे (Howrah-Mumbai Train) दोन डबे बिरशिबपूर परिसरात रात्री 9.30 च्या सुमारास वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब वेगळे झालेले डबे जोडण्यासाठी कामगारांना सूचना दिल्या. कपलिंग पूर्ववत होताच ट्रेनची सेवा पुन्हा सुरू होईल, असे दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) आदित्य चौधरी यांनी सांगितले. (हेही वाचा - Kerala Road Accident: केरळमध्ये बस आणि रिक्षाच्या धडकेत भीषण अपघात, 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement