Rajkot Bomb Threat: गुजरात राज्यातील राजकोटमध्ये 10 मोठ्या हॉटेल्सला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीसांकडून तपास सुरू
गुजरातमधील राजकोट शहरातील 10 मोठ्या हॉटेलांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. यामध्ये इतर काही पंचतारांकित हॉटेल्सचाही समावेश आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ईमेल द्वारे ही धमकी दिली आहे.
Rajkot Bomb Threat: गुजरातमधील राजकोट शहरातील 10 मोठ्या हॉटेलांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. यामध्ये आणखी काही पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ईमेल द्वारे ही धमकी दिली आहे. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. ज्यांचा काही तासांत स्फोट होईल. सध्या हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला आहे. सर्व हॉटेल्समध्ये सध्या तपास सुरू करण्यात आला आहे. हा ईमेल कोणी पाठवला आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. ऐन सणासुदीच्या वेळी आलेल्या या धमकीने शहरात खळबळ उडाली आहे. सर्व हॉटेल व्यवस्थापनांना सतर्क करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे अपघाताचा प्रयत्न? रुळांवर आढळला लाकडी ओंडका; घटनेत मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज)
राजकोटमधील 10 मोठ्या हॉटेलांना बॉम्बने उडवण्याची धमकी