Jammu Kashmir: यावर्षी काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केला 172 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या एडीजीपींनी ट्विटरद्वारे सांगितले की, लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे सर्वाधिक 108 दहशतवादी मारले गेले आहेत.

Encounter | (Photo Credits: Pixabay)

Jammu Kashmir: सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. काश्मीरचे एडीजीपी म्हणाले की, 2022 मध्ये एकट्या काश्मीर झोनमध्ये एकूण 93 यशस्वी चकमकी झाल्या आहेत. या दहशतवादी चकमकीत एकूण 172 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये 42 विदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. काश्मीरच्या एडीजीपींनी ट्विटरद्वारे सांगितले की, लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे सर्वाधिक 108 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यानंतर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे 35, एसएमचे 22, अबबद्रचे 4 आणि AGuH संघटनेचे 3 दहशतवादी मारले गेले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now