Theft in Yesvantpur-Kannur Express: यशवंतपूर-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सामानाची चोरी; मौल्यवान वस्तू लुटल्या

दरोडेखोरांनी झोपेत असताना प्रवाशांकडील लाखोंचे दागिने, रोख रक्कम आणि फोन चोरून नेले आहेत.

Photo Credit- x

Theft in Yesvantpur-Kannur Express: यशवंतपूर-कन्नूर एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२२९२मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी झोपेत असतानाच त्यांच्याकडील लाखोंचे दागिने, रोख रक्कम आणि फोन असा मौल्यवान ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी तामिळनाडू(Tamil Nadu)तील धर्मपुरी पोलीस ठाण्यात (Dharmapuri police station) चोरीची तक्रार दाखल केली. सालेम ते धर्मापुरी दरम्यान एसी कोचमध्ये ही चोरी झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यशवंतपूर येथून ट्रेनमध्ये चढलेले प्रवासी नौफल यांनी सांगितले की, या घटनेत 20 मल्याळी प्रवाशांचे मौल्यवान सामान हरवले आहे. सध्या पोलिसांनी घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा : Mumbai News: SBI बॅंकेतून 3 कोटी सोन्यांची चोरी, सर्व्हिस मॅनेजकरला अटक )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)