Rameshwaram Cafe Blast: रामेश्वरम कॅफेत ब्लास्ट होण्यापूर्वीचा व्हिडिओ आला समोर, संशयिताने ठेवली बॉम्ब बॅग

बेंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेत अचानक काल दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

Rameshwaram Cafe Blast PC TWITTER

Rameshwaram Cafe Blast:  बेंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेत अचानक काल दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अग्निशमन दलाने स्फोट कशाने झाल्याचा शोध घेतला.तर संशयित स्फोटक असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. तपासणी दरम्यान, एकाने कॅफेत संशयित बॅग ठेवल्याचे दिसून आले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, त्याने स्वत:कडची बॅग कॅफेत ठेवली. स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची संपुर्ण चौकशी आणि तपासणी होत आहे अशी माहिती बेंगळूरूच्या (सीपी) पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now