Bomb Threat at Summer Fields School in Delhi: दिल्ली शाळेला धमकीचा ईमेल पाठवणारा अखेर सापडला, शाळेत न जाण्यासाठी विद्यार्थ्यांनेच केला कारनामा
दिल्लीतील कैलास कॉलनी येथील GK 1 समर फिल्ड स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. शाळेला धमकीचा इमेल आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
Bomb Threat at Summer Fields School in Delhi: दिल्लीतील कैलास कॉलनी येथील GK 1 समर फिल्ड स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. शाळेला धमकीचा इमेल आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी या प्रकरणातून 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी 14 वर्षीय विद्यार्थ्याची विचारपूस केली. विद्यार्थ्यांने सांगितले की, त्याला शाळेला यायचे नव्हते त्यामुळे त्याने शाळेला धमकीचा ईमेल केला. हा मेल खरा असावा या करिता मुलाने आणखी दोन शाळेंना धमकीचा इमेल पाठवला होता अशी माहिती चौकशीतून समोर आली. या प्रकरणी दिल्ली पोलिस पुढील चौकशी - तपासणी करत आहे. (हेही वाचा- रांचीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या, प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)