Madhya Pradesh Accident: रस्ता ओलांडताना भरधाव कारने एका मुलीला धडक दिली. कारच्या धडकेत ती काही अंतर दूर फेकली गेली. एवढेच नव्हे तर पळून जाण्याच्या प्रयत्नात कार चालकाने मुलीच्या अंगावरून कार नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या घटनेत मुलीचे प्राण वाचले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ओबेदुल्लागंजमधील अर्जुन नगर पुलाच्या सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेनंतर रस्त्यावर गोंधळ उडाला होता. मुलीला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी कारचालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पंरतू कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- तीन वाहनांची धडक, 3 जण दगावले, आंध्रप्रदेशातील घटना)
जाको राखे साइयां मार सके न कोय…
ये कहावत तो आपने कई बार सुनी होगी। लेकिन इसका जीता जागता उदाहरण मध्य प्रदेश के रायसेन जिले से सामने आया है !!
देखें दर्दनाक Video कार की टक्कर से 10 फीट हवा में उछली बच्ची...
घटना के बाद चालक भागने की फिराक में था, ऐसे में घटना स्थल पर मौजूद… pic.twitter.com/4WfPHCGC6V
— Ranjeet (@ranjeet1479) June 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)