Thane News: ठाणे येथे भरधाव टेम्पोला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
ठाणे येथील कॅडबेरी सिग्लनवर भरधाव टेम्पोला भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
Thane News: ठाणे पश्चिम येथील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कॅडबरी सिग्नलजवळ सोमवारी सकाळी धावत्या टेम्पोला भीषण आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आपत्ती व्यवस्थापनाला मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी टाटा एस टेम्पोला आग लागली. हा टेम्पो पुठ्ठा आणि कागदाचा कचरा टाकून गांधीनगरहून कळव्याकडे जात होता. असे ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (RDMC) अधिकाऱ्याने सांगितले.
#WATCH | #Fire broke out in a running tempo near Cadbury signal at Eastern Express Highway in #Thane West on August 21. No casualties were reported.
By: @AbhitashS pic.twitter.com/SOQDd7I3aM
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)