Telangana Assembly Election Results 2023: तेलंगणात सुरक्षा वाढ, आमदारांना हलवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये बसेसची व्यवस्था (Watch Video)
Telangana Assembly Election Results 2023: तेलंगणातील कॉंग्रेसने आपल्या आमदारांना प्रतिस्पर्ध्यांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आणि गरज भासल्यास त्यांना हलवण्यासाठी हैद्राबाद येथील स्टार हॉटेलमध्ये बसेसची तयारी ठेवली आहे. उमेदवारांची घोडेबाजार रोखण्यासाठी ताज कृष्ण हॉटेलमध्ये एका खाजगी ट्रॅव्हल ऑपरेटरच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि इतर एआयसीसी निरीक्षक तळ ठोकून होते. निरीक्षक मतमोजणीच्या ट्रेंडवर लक्ष ठेवून होते आणि राज्य पक्षाच्या नेत्यांना आवश्यक सूचना देत होते. कर्नाटकचे मंत्री केएच मुनियप्पा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, काँग्रेसचा एकही आमदार पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्षांतर करणार नाही. (हेही वाचा- कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video)
शिवकुमार मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांसह शुक्रवारी उशिरा बेंगळुरूहून एका विशेष विमानाने हैदराबादला आले.तेलंगणातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचे समन्वय साधण्यासाठी AICC ने शिवकुमार, दीपा दास मुन्शी, डॉ. अजॉय कुमार, केजे जॉर्ज आणि के. मुरलीधरन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)