Students Attempt Suicide: गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद; इंदौर येथील घटना

मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

students attempt suicide PC Twitter

Students Attempt Suicide:  मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना नंदा नगर भागातील जी किड्स इंटनॅशनल स्कूलमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलाने गृहापाठ पूर्ण केला नाही त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. गुरुवारी मुलगा शाळेत आणि वरच्या मजल्यावर गेला आणि तिसऱ्या मजल्यावरून मुलाने थेट खाली उडी मारली. या घटनेनंतर तो जखमी झाला. स्थानिकाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now