‘Jalebi-Kachori’ Fight in Buxar: जलेबी आणि कचोरी न दिल्याने विद्यार्थ्यी संतापले, शिक्षकाला पळवून पळवून मारले, बिहार येथील घटना
बिहार येथील बक्सार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणांसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला पळवून पळवून मारले आहे. एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याला जलेबी आणि कचोरी वाटण्यात आली होती.
‘Jalebi-Kachori’ Fight in Buxar: बिहार येथील बक्सार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणांसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला पळवून पळवून मारले आहे. एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याला जलेबी आणि कचोरी वाटण्यात आली होती. परंतु काही विद्यार्थ्यांना जलेबी आणि कचोरी मिळाले नाही. त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारहाण केली. शिक्षक जेव्हा घरी जात होते त्यावेळीस विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. रागाच्या भरात विद्यार्थ्यांनी शिक्षकाला पळवून पळवून मारले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बक्सर जिल्ह्यातील मुरार इंटर लेव्हल हायस्कूलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा- चालत्या ट्रकच्या मागे जीव डोक्यात घालून स्केटिंग करत होते दोन तरुण, व्हिडीओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)