Spanish Woman Gangrape Case: झारखंड मध्ये काही दिवसांपूर्वी एका स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामुहिक बलात्कार केला होता. या धक्कादायक प्रकरणी डुमका पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ अटक केले होते. स्पॅनिश महिला पतीसोबत पश्चिम बंगालहून नेपाळला जात असताता हंसदिहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. बलात्कार करून त्यांच्याकडे असलेली पैसे आणि किंमती वस्तूची चोरी देखील केली. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी दखल घेतली. पोलिसांनी कारवाई सुरु करताच जिल्हा उपायुक्तांनी बलात्कार पीडितेच्या पतीला 10 लाख रुपयांची भरपाई सुपूर्द केली.
#WATCH | Spanish woman gang rape case | A compensation of Rs 10 lakhs handed over to the husband of the rape survivor, by Deputy Commissioner in Dumka, Jharkhand. pic.twitter.com/c2QU9QxWBQ
— ANI (@ANI) March 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)